शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (22:10 IST)

खाद्यतेलाबाबत सरकारचा मोठा निर्णय, तेलाचे भाव 280 रुपयांनी स्वस्त होणार

गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. या मालिकेत आता सरकारने कच्च्या पामतेलावरील प्रभावी सीमाशुल्क 5.5 टक्क्यांवर आणले आहे. या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी होण्यास मदत होणार असून ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

अधिकृत अधिसूचनेनुसार, कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर आता क्रूड पाम तेलावर 5 टक्के आकारला जाईल, जो आतापर्यंत 7.5 टक्के होता. या कपातीनंतर कच्च्या पाम तेलावरील प्रभावी सीमाशुल्क 8.25 टक्क्यांऐवजी 5.5 टक्के होईल.
 
किती कमी होणार भाव : व्यापाऱ्यांच्या मते या कपातीमुळे भाव 280 रुपये प्रति क्विंटलने कमी होऊ शकतात. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्येही सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात केली होती.भारत आपल्या खाद्यतेलाच्या 60 टक्क्यांहून अधिक गरजा आयातीद्वारे भागवतो. इंडोनेशिया आणि मलेशिया हे भारताला RBD पामोलिन आणि क्रूड पाम तेलाचे प्रमुख पुरवठादार आहेत.