Widgets Magazine
Widgets Magazine

जीएसटी 1 जुलैपासूनच

arun jetaly

कोणत्याही परिस्थितीमध्ये 1 जुलैपासूनच जीएसटी लागू करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारच्यावतीने पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठीची सर्व तयारीही पूर्ण करण्यात आली असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.
 
जीएसटी प्रणाली तातडीने लागू केली जाऊ नये, यासाठी काही घटकांकडून प्रयत्न केले जात असल्याचे समोर आले आहे. बाजारपेठेमध्ये त्याबाबत अफवाही पसरवल्या आणि विविध समाजमाध्यमातून फिरवल्या जात असल्याने सरकारच्यावतीने पुन्हा एकदा जीएसटीच्या अंमलबजावणीबाबत ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
जीएसटीच्या अंमलबजावणीबाबत औद्योगिक क्षेत्रातील काही घटकांच्या विविध मागण्या आहेत. पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मिश्रा यांनीही जीएसटीची अंमलबजावणी सुमारे एक महिनाभर पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तथापि केंद्र सरकार जीएसटीच्या 1 जुलैपासूनच्या अंमलबजावणीवर ठाम आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम (सीबीइसी) यासाठी कार्यरत असून त्यांनी राज्य सरकारांच्या माध्यमातून लहानात लहान व्यापाऱयांपर्यंत पोहोचण्यासाठी धडक मोहीम राबवली असल्याचा अर्थमंत्रालयाने दावा केला आहे.
 
महसूल हसमुख अढिया यांनी जीएसटीच्या अंमलबजावणीवर केंद्र सरकार ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, जीएसटीची अंमलबजावणी लांबवणीवर टाकण्याबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. 1 जुलैपासून अंमलबजवणी करण्यावर सरकार ठाम असून याबाबतची तयारी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर अर्थखात्यानेही देशाच्या आर्थिक घडामोडींवर मोठी क्रांती घडवणारा निर्णय असून याच्या अंमलबजावणीसाठी अर्थखाते तयार असून 1 जुलैपासूनच याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे म्हटले आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

आरबीआयकडून 500 रुपयांची नवी नोट जारी

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने 500 रुपयांची नवी नोट जारी केली आहे. या नव्या नोटा महात्मा गांधी ...

news

पेट्रोल, डिझल दराची माहिती देण्यासाठी तेल कंपन्यांनी विशेष व्यवस्था

येत्या 16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना ...

news

GSTतील 66 वस्तूंच्या करात कपात

जीएसटी परिषदेने झालेल्या बैठकीत 66 वस्तूंवरच्या करात बदल करून ते कमी करण्याचा निर्णय ...

news

टाटा मध्ये आता सर्व कर्मचारी कोणतेही पदे नाहीत

भारतातल्या ऑटोमोबाईल्स कंपन्यांपैकी ‘टाटा मोटर्स’मधल्या अधिकाऱ्यांची सर्व पदं रद्द ...

Widgets Magazine