बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

बजाजची चेतक पुन्हा एकदा धावणार

सुमारे तीन दशकांपूर्वीपासून भारताच्या रस्त्यांवर दिमाखात धावणारी बजाज ऑटोची चेतक ही स्कूटर आता पुन्हा एकदा धावणार आहे. बजाज ऑटोने Urbanite ब्रँड अंतर्गत चेतक स्कूटर इलेक्ट्रिक प्रकारात सादर केली. ही बजाजची पहिलीच इलेक्ट्रिक स्कूटर आहे. 
 
नव्या चेतक इलेक्ट्रिकमध्ये Eco आणि Sport मोड देण्यात आले आहेत. या स्कूटरमध्ये कंपनीने अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS) सारख्या फीचर्सचा समावेश केला आहे. चेतक आता जुन्या काळातून बाहेर आली असून पूर्णतः आधुनिक झालीये. सप्टेंबर महिन्यापासून कंपनीच्या चाकण येथील प्रकल्पामध्ये या स्कूटरचं प्रोडक्शन घेण्यास सुरूवात झाली आहे. पण पुढील वर्षी जानेवारी महिन्यात कंपनी ही स्कूटर लाँच करणार आहे. त्याचवेळी स्कूटरच्या किंमतीबाबतही घोषणा केली जाईल.
 
या स्कूटरमध्ये फिक्स्ड टाइप बॅटरीचा वापर केला जाईल, म्हणजेच यातील बॅटरी पोर्टेबल नसेल. विविध सहा रंगामध्ये ही स्कूटर सादर करण्यात आली आहे. यात lithium-ion बॅटरी देण्यात आली असून स्टँडर्ड 5-15 amp आउटलेटद्वारे चार्ज करता येणं शक्य आहे.  स्कूटरमध्ये डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, की-लेस इग्निशन, पुढील बाजूला हेडलँप्सजवळ ओव्हल LED स्ट्रिप यांसारखे अनेक प्रीमियम फीचर्स आहेत.