ट्रायच्या निर्णयाशी सरकार सहमत नाही, केबल ऑपरेटर व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेऊ - केंद्रीय नभोवाणी व माहिती प्रसारण राज्यमंत्री हर्षवर्धन सिंह राठोड

Rajyavardhan Rathore
Last Modified मंगळवार, 8 जानेवारी 2019 (08:51 IST)
ट्रायच्या निर्णयाबाबत केबल ऑपरेटर मध्ये प्रचंड असंतोष आहे त्यामुळे त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केलेल्या नुसार आज केबल ऑपरेटर व डिस्ट्रीब्यूटर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची व
सेना-भाजपच्या खासदार यांची केंद्रीय नभोवाणी व माहिती प्रसारण राज्यमंत्री हर्षवर्धन सिंह राठोड यांनी नवी दिल्लीत भेट झाली. ट्रायच्या निर्णयाशी सरकार सहमत नाही
तसेच याबाबत केबल व्यवसायाशी संबंधितांचे म्हणणे सरकार ऐकून घेईल, अशी ग्वाही यावेळी राज्यमंत्र्यांनी दिली.

ट्रायच्या नवीन निर्णयाबाबत केबल ऑपरेटर संघटनांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. ऑपरेटर संघटनी त्याला तीव्र आक्षेप घेतला असून त्याबाबत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचे म्हणणे सरकारकडे मांडता यावे व त्यांना न्याय मिळावा व ग्राहक हितही जोपासले जावे यासाठी या प्रकरणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय राज्यमंत्री हर्षवर्धन राठोड यांनी केबल ऑपरेटर व डिस्ट्रीब्यूटर संघटनांचे पदाधिकारी तसेच मुंबईतील सेना-भाजप भाजपचे खासदार यांची संयुक्त बैठक घ्यावी अशी मागणी केली होती. शिवसेना आमदार अनिल परब यांच्यासह नेतृत्वात केबल ऑपरेटर व डिस्ट्रीब्यूटर संघटनेचे पदाधिकारी अशोक सिंग, मंगेश वाळंज, सराफ, जितेंद्र राऊत आदी उपस्थित होते तसेच भाजप खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, शिवसेना खासदार गजानन किर्तीकर आनंदराव अडसूळ, राहुल शेवाळे,
अरविंद सावंत यांचाही यामध्ये समावेश होता. यावेळी केबल ऑपरेटर व डिस्ट्रीब्यूटर संघटनेच्या वतीने आमदार अनिल परब यांनी ट्रायच्या नवा निर्णय केबल ऑपरेटर साठी कसा अन्यायकारक आहे याबाबत मंत्र्यांकडे सविस्तर ऊहापोह केला. केबल व्यवसायातील रेव्ह्यूनू चे वाटप 80% ब्रॉडकास्टर यांना जात असून 20% एमएसओ व एलसिओ म्हणजे केबल आँपरेटरला देण्यात येते हे अत्यंत अन्यायकारक आहे. हा व्यवसाय असून केबल व्यवसायातून अनेक स्थानिक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. ट्रायच्या नव्या निर्णयामुळे या संपूर्ण व्यवसायावर गदा आली आहे त्यातून अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत त्यामुळे ट्रायच्या नव्या निर्णयाची जो केबल ऑपरेटर वर अन्यायकारक आहे त्याची अंमलबजावणी करण्यात येऊ नये अशी मागणी संघटनेच्या वतीने राज्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
केबल ऑपरेटर आणि डिस्ट्रीब्यूटर संघटनेने माझ्याकडे मागणी केल्यानंतर मी राज्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली ती तातडीने उपलब्ध करून देऊन या सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकल्याबद्दल आमदार आशिष शेलार यांनी राज्यमंत्री राठोड यांचे आभार मानले .तसेच यावेळी केबल ऑपरेटर व डिस्ट्रीब्यूटर यांची बाजू मांडताना त्यांनी सांगितले की या व्यवसायातील महसुलाचा मोठा हिस्सा हा ब्रॉडकास्ट करणाऱ्यांना जातो तर अत्यंत कमी हिस्सा ऑपरेटर आणि डिस्ट्रीब्यूटर ना मिळतो याचे ट्रायने ठरवलेले नवीन सूत्र हे या ऑपरेटर आणि डिस्ट्रीब्यूटर अधिकच अन्याय करणारे आहे.त्यामुळे या सूत्राचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी त्यांनी लावून धरली.
दरम्यान या सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री राज्य वर्धन सिंह यांनी या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले की केबल व्यवसायाशी संबंधितांचे म्हणणे ऐकून घेऊ, अशी ग्वाह संघटनेला केंद्रीय राज्यमंत्र्यांनी मोठा दिलासा दिला आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण
गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त येत आहे. दाऊदबरोबरच त्याच्या ...

भयंकर, दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकले

भयंकर, दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकले
मुंबईतील मीरारोडमधील एका बारमध्ये दुहेरी हत्याकांड घडले आहे. एका बारमध्ये दोन ...

पॅकेज नाही तर नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटींच्या मदतीची घोषणा

पॅकेज नाही तर नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटींच्या मदतीची घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या रायगडमधील नुकसानग्रस्तांसाठी ...

बाप्परे, कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिले

बाप्परे, कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिले
मुंबईत ६५ वर्षीय कॅन्सरग्रस्त रुग्णाची कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिल्याची घटना ...

रिलायन्स जिओने इलेक्ट्रॉनिक्सपासून ते कपड्यांपर्यंत, आकर्षक ...

रिलायन्स जिओने इलेक्ट्रॉनिक्सपासून ते कपड्यांपर्यंत, आकर्षक सवलतीत 4X लाभ सादर केला
यावेळी रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक अतिशय खास आणि आकर्षक ऑफर ...