शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

२ लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार रोखीने करण्यावर निर्बंध

रोख रकमेचा वापर कमी व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी कॅशलेस व्हावे, यासाठी  दोन लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार रोख रकमेत करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. 

‘दोन लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम एका व्यक्तीकडून दिवसातून एक किंवा अनेक व्यवहारांच्या माध्यमातून घेण्यावर बंदी आहे,’ असे आयकर विभागाने म्हटले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येईल, असा इशारादेखील आयकर विभागाकडून देण्यात आला आहे. 'गो कॅशलेस गो क्लिन' असा संदेश आयकर विभागाने जारी केला आहे.
 
नव्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्याबद्दलची माहिती संबंधित परिसरातील आयकर विभागाच्या मुख्य आयुक्तांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी आयकर विभागाने [email protected] हा ई-मेल आयडी दिला असून त्यावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.