शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 20 मार्च 2017 (16:56 IST)

व्होडाफोन आणि आयडिया यांच्या विलिनीकरणावर शिक्कामोर्तब

मूळच्या ब्रिटनमधील व्होडाफोनने भारतातील व्यवसाय स्पर्धक आयडिया सेल्युलरला विकण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये जानेवारीपासून चर्चाही सुरु होती. दोन महिन्यांच्या चर्चेनंतर विलिनीकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे. व्होडाफोनचे विलिनीकरण झाल्याने आदित्य बिर्ला समूहातील आयडिया सेल्युलर ही देशातील सर्वात मोठी मोबाईलधारक ग्राहक असणारी कंपनी बनली आहे.

व्होडाफोन आणि आयडियाच्या विलिनीकरणानंतर चेअरमनपद आयडियाकडे जाईल. तर सीएफओचे पद व्होडाफोनकडे गेले आहे. नवीन कंपनीमध्ये व्होडाफोनची भागीदारी ४५ टक्के आणि आयडियाची भागीदारी २६ टक्के असणार आहे. पुढे जाऊन आदित्य बिर्ला ग्रूप आणि व्होडाफोनची भागीदारी समान होईल.