testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आयकर करदात्यांनी जमा केलेल्या करात 26.2 टक्क्यांची वाढ

Last Modified शनिवार, 17 जून 2017 (12:04 IST)
आयकर विभागाकडे
15 जूनपर्यंत
एकूण 1 लाख 1 हजार 24 कोटींचा आयकर जमा झाला आहे. गतवर्षींच्या तुलनेत करदात्यांनी जमा केलेल्या करात 26.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. गतवर्षी 15 जूनपर्यंत जमा झालेल्या आयकराची रक्कम 80 हजार 75 कोटी इतकी होती. मेट्रो शहरांमध्ये मुंबईने सर्वात जास्त महसूल गोळा केला आहे. ही आकडेवारी 1 एप्रिल ते 15 जूनपर्यंतची आहे.
मुंबईत करदात्यांनी सर्वात चांगला प्रतिसाद दिला असून जवळपास 138 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मुंबईत एकूण 22 हजार 884 कोटींचा आयकर जमा झाला आहे. गतवर्षी हा आकडा फक्त नऊ हजार 614 कोटी इतकाच होता. दोन्ही वर्षांतील आकडेवारीची तुलना करता ही वाढ तब्बल 138 टक्क्यांची आहे.यावर अधिक वाचा :