सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (16:30 IST)

नवीन उर्जेच्या जोरावर भारत येत्या 20 वर्षात महासत्ता बनेल - मुकेश अंबानी

नवी दिल्ली: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले की, येत्या दोन दशकांत भारत नव्या ऊर्जेच्या जोरावर जागतिक शक्तीचा दर्जा प्राप्त करेल. अंबानी 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान "एशियन इकॉनॉमिक डायलॉग 2022" ला संबोधित करत होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष रघुनाथ माशेलकर यांच्याशी झालेल्या संभाषणात मुकेश अंबानी म्हणाले की, पुढील दोन दशकांत 20 ते 30 भारतीय ऊर्जा कंपन्यांमध्ये रिलायन्सइतकी मोठी क्षमता आहे.
 
अंबानी म्हणाले की “नवीन उर्जेमध्ये पुन्हा एकदा जग निधार्रित करण्याची शक्ती आहे. उदाहरणार्थ, लाकडाचे कोळशात रूपांतर झाले तेव्हा युरोपने भारत आणि चीनला मागे टाकले होते. त्याचप्रमाणे अमेरिका आणि पश्चिम आशियातील देश तेलाच्या बाबतीत खूप पुढे गेले. आता भारताची वेळ आली आहे, जेव्हा भारत हरित आणि स्वच्छ ऊर्जेत स्वयंपूर्ण होईल आणि निर्यात करेल, तेव्हा भारताला जागतिक महासत्ता म्हणून उदयास येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. हरित ऊर्जेमुळे भारत केवळ जागतिक महासत्ता बनणार नाही तर रोजगारही निर्माण होईल. परकीय चलनही वाचेल.
 
पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा संदर्भ देत मुकेश अंबानी म्हणाले की, श्री मोदी हे नवीन आणि स्वच्छ ऊर्जेचे मोठे समर्थक आहेत. सरकारने नवीन ऊर्जेसाठी आपले दरवाजे उघडल्यामुळे भारत हरित ऊर्जा निर्यात करेल यात मला शंका नाही. त्या समर्थनार्थ धोरणे आणली आहेत. ज्याप्रमाणे भारत आयटी क्षेत्रातील महासत्ता आहे, त्याचप्रमाणे भारत अक्षय ऊर्जा क्षेत्रातही जागतिक आघाडीवर बनेल. पुढील 20 वर्षांत भारतातून स्वच्छ आणि हरित ऊर्जा निर्यात अर्धा ट्रिलियन डॉलर्सची होण्याची अपेक्षा आहे. नवीकरणीय ऊर्जेतील गुंतवणुकीसाठी भारत हा जगातील सर्वाधिक पसंतीचा देश आहे.