testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

व्यक्तीच्या भविष्यातील उत्पन्नाचा विचार करुन विमा भरपाई

insurance
Last Modified बुधवार, 1 नोव्हेंबर 2017 (16:32 IST)

रस्ते अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीच्या भविष्यातील उत्पन्नाचा विचार करुन त्याच्या कुटुंबीयांना

भरपाई
देण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे यापुढे विम्याची रक्कम देताना मृत पावलेली व्यक्ती जिवंत असती, तर भविष्यात तिची कमाई किती असती, हे आता पाहिले जाणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला.


या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार, यापुढे रस्ते अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम देताना त्याच्या सध्याच्या नव्हे, तर भविष्यातील उत्पन्नाचा विचार केला जाईल. यासोबतच संबंधित व्यक्ती नोकरी करत होती की तिचा व्यवसाय होता, हेदेखील लक्षात घेतले जाणार आहे.यावर अधिक वाचा :