गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 15 जून 2020 (08:08 IST)

शेअर बाजार नाही तर गुंतवणूकदारांनी केली यात केली मोठी गुंतवणूक

कोरोना विषाणूच्या संकटामुळे शेअर बाजारात चढ-उतार दिसून येत आहे. गुंतवणूकदारांनी मे महिन्यात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये 815 कोटींची गुंतवणूक केली आहे. याचे प्रमुख आणि  मुख्य कारण असे आहे की या संकटाच्या काळात गुंतवणूकदार कोणत्याही प्रकारच्या जोखीम घेण्याचे टाळत आहेत आणि सुरक्षित गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये अधिक रस दाखवत आहेत. वर्ष 2019 मध्ये या श्रेणीची कामगिरी इतर मालमत्तांच्या तुलनेने चांगली होती. ऑगस्ट 2019 पासून गोल्ड ईटीएफमध्ये एकूण 3,299 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अ‍ॅम्फी) यांनी ही माहिती प्रसिद्ध केली  आहे.
 
अ‍ॅम्फीच्या ताज्या आकडेवारीनुसार यावर्षी मे महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये 815 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. एप्रिलमध्ये या फंडात गुंतवणूकदारांनी 731 कोटींची गुंतवणूक केली होती. मार्चमध्ये परिस्थिती थोडी वेगळी होती आणि गुंतवणूकदारांनी या फंडातून 195 कोटी रुपये काढून घेतले.  यापूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये या फंडात 1,483 कोटी रुपये आणि जानेवारीत 202 कोटींची गुंतवणूक होती. त्याचबरोबर, डिसेंबर 2019 मध्ये गुंतवणूकदारांनी त्यात 27 कोटी आणि नोव्हेंबरमध्ये 7.68 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तथापि, ऑक्टोबरमध्ये गुंतवणूकदारांनी फंडातून 31.45 कोटी रुपये काढले होते.
 
ग्रो चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष जैन म्हणाले, ‘कोरोना साथीच्या आधीच्या महिन्यांपेक्षा आता गोल्ड ईटीएफमध्ये जास्त गुंतवणूक दिसून येत आहे. शेअर बाजारातील चढ-उतार लक्षात घेता बरेच गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणूकीवर अधिक भर देत आहेत.’