शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (16:29 IST)

जावा कंपनीचे पुण्यात देशातील पहिले शोरूम सुरू

भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजवलेली जावा नव्या ढंगात पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. १ नोव्हेंबर रोजी जावा कंपनीने जावा मोटारसाकलचे देशातील पहिले शोरूम पुण्यात सुरू झालं आहे. बाणेर आणि चिंचडवडमध्ये जावा मोटारसायकलची शोरूम सुरू झाली आहेत.‘जावा, जावा 42 आणि जावा पेराक’ असे तीन नवे मॉडेल्स सादर केले होते. देशभरात एकूण १०५ डिलर्सकडे ही मोटरसायकल विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे, तसंच डिसेंबरपर्यंत अजून ६४ डिलर्सकडे ही मोटरसायकल विक्रीसाठी आणि टेस्ट राइडसाठी उपलब्ध होईल असं लाँचिंग कार्यक्रमात सांगण्यात आलं.
 
बाणेर आणि चिंचवड स्टेशनजवळ असेलेल्या जावा शोरूममध्ये मोटारसायकलचे बुकींग सुरू झाले आहे. ५००० रूपयांचे टोकण घेऊन जावाची दमदार बाईक बूक करता येणार आहे. मार्च महिन्यामध्ये जावाची मोटारसायकल तुम्हाला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जानेवारीमध्ये गाडीच्या उत्पादनाला सुरूवात होणार आहे.