बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

नवीन पॉलिसी लॉन्च, मुलांच्या नावावर 206 रुपये गुंतवणूक करून मिळवा 27 लाख रुपये

आपल्या मुलांच्या उच्च शिक्षा आणि जीवनासाठी प्रत्येक आई-वडील प्रयत्न करत असतात. परंतू महागाईच्या या काळात आपल्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे सोपे नाही. अशात लाईफ इंश्योरेंस कंपनी म्हणजे एलआयसीने एक नवीन योजना लॉन्च केला आहे.
 
या योजनेत भविष्यतर सुरक्षित राहीलच पण त्यांच्या मागण्यादेखील पुरवता येतील. या योजनेचे नाव आहे 'न्यू चिल्ड्रंस मनी बँक योजना 832'
 
25 वर्ष पूर्ण झाल्यावर मिळेल पैसा
या पॉलिसीचा पैसा मुलांचे वय 25 वर्ष पूर्ण झाल्यावर मिळेल. जसे आपल्या मुलाचे वय 12 वर्ष तर ही पॉलिसी 13 वर्षांनंतर मॅच्योर होईल. मुलं पाच वर्षाचे असेल तर पॉलिसी 20 वर्षानंतर मॅच्योर होईल. जर आपण 14 लाखाची पॉलिसी घेत असाल तर आपल्याला सुमारे 27 लाख रुपये मिळतील.
 
विशेष बाब
तसेच पॉलिसीची सर्वात विशेष गोष्ट ही आहे की या अंतर्गत आपल्याला दररोज केवळ 206 रुपये गुंतवणूक करावी लागेल. एवढेच नव्हे तर पॉलिसीमध्ये प्रवेशाचे वय किमान शून्य वर्ष आणि अधिकात अधिक वय 12 वर्ष आहे.
 
पॉलिसी अंतर्गत दररोज 206 रुपये गुंतवणूक केली तर 27 लाख रुपयांचा फंड एकत्र होईल. हे फंड आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ठेवू शकता. त्यांच्या शिक्षणावर खर्च करू शकता.
 
भुगतान संबंधी माहिती
एलआयसी पॉलिसी अंतर्गत आपल्याला भुगतानाचे पर्याय मिळेल. राशी भुगतान आपण वार्षिक, अर्धवार्षिक, तीन महिने किंवा दर महिन्याला करू शकता. याची किमान विमा राशी एक लाख रुपये आहे. तसेच अधिकात अधिक विमा राशी मर्यादित नाही.
 
प्रिमियम राशी
पॉलिसी अंतर्गत आपल्याला वर्षाला 77,334 रुपये द्यावे लागतील. आपण सहा महिन्यानंतर प्रिमियम राशीचे भुगतान करू इच्छित असाल तर आपल्याला 39,086 रुपयांची राशी द्यावी लागेल. तीन महिने आणि दर महिन्याला प्रिमियम भुगतान करणार्‍यांना क्रमशः: 19,750 आणि 6,584 रुपये द्यावे लागतील. ही पहिल्या वर्षाची प्रिमियम राशी आहे. आपल्याला 12 वर्षापर्यंत प्रिमियम भुगतान करावे लागेल.