बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : शनिवार, 26 मार्च 2022 (14:22 IST)

LPG gas price hike: घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले, आता मोजावे लागणार एवढे पैसे

रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 40 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे.
 
 तेल विपणन कंपन्यांनी आज मंगळवारी एलपीजी गॅसच्या दरातही 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 949.50 रुपये मोजावे लागतील.
 
मंगळवारची सकाळ सर्वसामान्यांना सुखद धक्का देणारी ठरली. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ केल्यानंतर आता एलपीजीच्या दरातही 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 949.50 रुपये मोजावे लागतील

6 ऑक्टोबर रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत शेवटची वाढ करण्यात आली होती. बऱ्याच महिन्यानंतर आता एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी दूध कंपन्यांनी देखील दुधाचे दर दोन ते पाच रुपये वाढवले आहेत. त्या मुळे आता सर्वसामान्य माणसांना महागाईचा फटका बसणार आहे.