शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 25 सप्टेंबर 2018 (11:04 IST)

माल्या म्हणतो ईडी चे चुकले

विजय मल्ल्याला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने फरार घोषित करावे अशी याचिका दाखल केली होती. मागच्या दोन ते तीन वर्षात मी सरकारी बँकांचे कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला या याचिकेवर त्याने उत्तर दिले आहे. ईडीने प्रत्येक पायरीवर आपल्या कर्ज फेडीची ही प्रक्रिया सुलभ करण्याऐवजी मार्गात अडथळे निर्माण केले असा आरोप मल्ल्याने केला आहे. फरार म्हणून घोषित करण्याच्या ईडीच्या याचिकेवर मल्ल्याने आक्षेप घेतला आहे.
 
आपण ब्रिटनमधल्या यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करत आहोत असे हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये त्याने कोर्टाला सांगितले आहे. ब्रिटनमधली मल्ल्याच्या हस्तांतरणा संबंधीची सुनावणी समाप्त झाली असून यासंबंधी १० डिसेंबरला निकाल सुनावण्यात येणार आहे. हस्तांतरणाच्या याचिकेवर निकाल येईपर्यंत सध्या सुरु असलेली सुनावणी स्थगित करण्याची मागणी त्याने याचिकेत केली आहे.त्यामुळे अरुण जेटली आणि विजय मल्या यांचा वाद अजूनही कायम आहे.