शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

मॅकडोनाल्ड्सच्या बर्गरमध्ये अळ्या, ग्राहकाला 70 हजारांची भरपाई

उत्तर प्रदेश स्थित नोएडा येथील मॅकडोनाल्ड्सच्या एका आउटलेटला ग्राहकाला 70 हजार रुपये भरपाई म्हणून भुगतान करावे लागले. बातमीनुसार एका ग्राहकाने पाच वर्षांपूर्वी येथे बर्गर खाल्ले होते ज्यातून अळ्या सापडल्या होत्या. बर्गर खाल्ल्यानंतर ग्राहक आजारी पडला. जेव्हा हे प्रकरण जिल्हा फोरममध्ये पोहचलं तर भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला. 
 
दिल्ली स्टेट कन्झ्यूमर डिस्प्यूट्स रिड्रेशल कमिशनने जिल्हा फोरमचा आदेश जारी ठेवला आणि अमेरिकन कंपनीला आदेश फर्मावला की त्यांनी ग्राहकाला सत्तर हजार रुपये भरपाई द्यावी. मॅकडॉन्ल्ड्सने जिल्हा फोरमकडून दिलेल्या आदेशाविरुद्ध स्टेट कमिशनमध्ये याचिका दाखल केली होती. 
 
रिपोर्टप्रमाणे दिल्ली रहिवासी संदीप सक्सेना 10 जुलै 2014 रोजी नोएडा स्थित जीआयपी मॉलमध्ये मॅकडोनाल्ड्सच्या आउटलेटवर गेले होते. तिथे त्यांनी मॅक आलू टिकी ऑर्डर केलं होते. बर्गर खाताना त्यांनी किडा खाल्ल्याचे जाणवले आणि नंतर त्यांना उलट्या होऊ लागल्या.
 
त्यांनी बर्गर उघडून बघितल्यावर त्यांना त्यात किडा दिसला. उलट्या बंद झाल्यावर त्यांनी आधी पोलिसांना फोन केला आणि नंतर जिल्हाधिकार्‍यांना फोन केला. तेथून फूड इंस्पेक्टरांचा नंबर सापडला. या दरम्यान त्यांनी आउटलेट मॅनेजरशी बोलण्याची इच्छा जाहीर केली परंतू त्यांना मदत मिळाली नाही.
 
संदीप सक्सेना हॉस्पिटल गेले आणि फूड इंस्पेक्टरने बर्गरचे सॅपल घेतले जे अनसेफ होते. फूड चेनने आपल्या वकिलामार्फत तर्क दिले की तक्रार किंवा एफआयआर दाखल केलेली नाही, तरी ग्राहकाने पीसआर कॉल केला होता, कंपनीला फूड इंस्पेक्टरकडून कुठलेही नोटिस मिळालेले नाही, यासाठी पुराव्याची विस्तृत तपासणी केल्या जाण्याची आवश्यकता आहे.
 
नंतर जिल्हा फोरमने मॅकडॉनल्ड्सला आदेश दिला की त्यांनी सक्सेना यांना उपचारासाठी खर्च केलेले 895 रुपये, मानसिक कष्ट दिल्याबद्दल पन्नास हजार आणि केस करण्यात खर्च करण्यात आलेले वीस हजार रुपये भरपाई म्हणून द्यावे.