Widgets Magazine

पुढील आठवड्यात सलग ३ दिवस राहणार बँका बंद

bank
नवी दिल्ली| Last Modified सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (11:43 IST)
सध्या सणांचा हंगाम सुरु आहे. एकापाठोपाठ एक सण येत असल्यामुळे सुट्ट्यांमध्ये बँकाही बंद असणार आहेत. पुढच्या आठवड्यात बँक सलग तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे तुमचे बँकेत जर महत्त्वाचे काम असेल तर पुढच्या आठवड्यात आटपून घ्या.
जर तुम्हाला बँकेत चेक जमा करणे, ड्राफ्ट बनवणे यासारखी कामे असतील तर खालील तारखा लक्षात ठेवा. ३० सप्टेंबरला विजयादशमी आहे त्यामुळे शनिवारी बँक बंद असेल. त्यानंतर रविवार १ ऑक्टोबरला साप्ताहिक सुट्टी आणि २ ऑक्टोबरला गांधी जयंती असल्याने बँक बंद राहणार आहे. त्यामुळे एटीएममध्येही नोटांचा तुटवडा जाणवू शकतो.


यावर अधिक वाचा :