सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 10 एप्रिल 2022 (11:59 IST)

महागाईचा भडका !चिकन मटणचे दर दुप्पटीने वधारले, नॉनव्हेज प्रेमींना निराशा

nonveg bangara kari
सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन वाढीमुळे भाजीपालासोबत आता चिकन आणि मटण चे भाव वधारले आहे. मटणाचे भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नॉनव्हेज प्रेमी चिकन पसंत करू लागले होते. मात्र आता चिकनच्या दरात देखील वाढ झाल्यामुळे नॉनव्हेज प्रेमींना मोठा धक्का बसला आहे. चिकन चे दर कोरोनाच्या पहिल्या लाटेत 120 ते 140 रुपये प्रतिकिलो होते. आता ते दर दुपट्टीने वाढून 260 ते 280 रुपये प्रतिकिलो झाले आहे.  
 
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन मुळे पोल्ट्री चालकांना मोठा फटका बसल्याने काहींना पोल्ट्री व्यवसाय बंद करावा लागला. लोक कर्जबाजारी झाले. अवकाळी पावसामुळे पिकावर देखील परिणाम झाला असून सोयाबीन आणि मक्याच्या खाद्यात विक्रमी वाढ झाली आहे. कोंबडी पाळण्यावर पूर्वी 70 ते 80 रुपये खर्च येत होता. आता 110 ते 120 रुपयांपर्यंत खर्च येतो. कोंबड्याना लागणारे खाद्यान्न महाग झाले आहे. त्यामुळे पोल्ट्री चालक अडचणीत आले असून त्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. जिवंत कोंबडी आता 150 रुपये प्रतिकिलोच्या दराने मिळत आहे. पूर्वी जिवंत कोंबडी 80 ते 90 रुपयांना मिळत होती. गावरान कोंबडा 500 रुपये दराने विकला जात आहे. तर हैदराबादी कोंबडी 360 ते 380 रुपये किलोच्या भावाने विकली जात आहे .त्यांमुळे आता चिकन आणि मटणाचे भाव वाढल्यामुळे नॉनव्हेज प्रेमींना निराशा झाली असून आता रविवार स्पेशल मेनू देखील महागला आहे .