रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (13:20 IST)

आता देशभरात धावणार 150 प्रायव्हेट ट्रेन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या बजेट भाषणात देशात 150 खासगी ट्रेन चालवण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार रेल्वेने देशभरातून 100 मार्गांची निवड केली आहे. खासगी ट्रेन चालविण्यासाठी देशी-विदेशी अनेक उद्योग समूहांनी उत्सुकता जाहीर केली आहे. 
 
खासगी ट्रेन चालवण्यासाठी मुंबई- नवी दिल्ली, चेन्नई- नवी दिल्ली, नवी दिल्ली- हावड़ा, शालीमार- पुणे, नवी दिल्ली- पाटणा अशा काही मार्गांची निवड करण्यात आली आहे. 
 
खासगी ट्रेन चालविण्यात इच्छुक कंपन्यांमध्ये अल्स्टॉम ट्रान्सपोर्ट, बॉम्बार्डियर, सीमेंस एजी, ह्युंदाई रोटेम कंपनी आणि मॅकक्वेरी यासह अनेक जागतिक दर्जाच्या कंपन्यांचा समावेश आहे. तर देशातील टाटा रियल्टी अँड इंफ्रास्ट्रक्चर, हिताची इंडिया आणि साउथ एशिया, एस्सेल ग्रुप, अदानी पोर्ट्स आणि सेझ, भारतीय रेल्वे केटरिंग अ‍ॅड टुरिझम कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे.
 
या खासगी रेल 16 डब्यांच्या असून त्यांचा वेग दरताशी 160 कि.मी. इतका असेल. या रेल्वेचं भाडं आणि मेन्टेनन्सची जबाबदारी खासगी कंपन्यांवरच असेल. खासगी ट्रेन सुटण्याच्या निर्धारित वेळेच्या 15 मिनिटांमध्ये इतर कोणतीही नियमित धावणारी रेल्वे सुटणार नाही.