Widgets Magazine
Widgets Magazine

पीएफची रक्कम आता 10 दिवसांत तुमच्या खात्यात जमा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) रक्कम काढू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
यापुढे ही रक्कम दहा दिवसांमध्ये तुमच्या खात्यात जमा होऊ शकेल.

कर्मचाऱ्याने आवश्यक अर्ज करून इतर कागदपत्रांची पूर्तता केल्यावर दहा दिवसांच्या आत त्याला पीएफ खात्यातील रक्कम मिळू शकेल.

या आधी यासाठी २० दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. पण कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापनाने नवी सनद तयार केली असून, त्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी ही सनद औपचारिकपणे जाहीर केली.


यावर अधिक वाचा :