Widgets Magazine
Widgets Magazine

ओएनजीसीमध्ये एचपीसीएलचे विलीनीकरण

बुधवार, 1 मार्च 2017 (10:55 IST)

ongc

ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) कंपनी देशातील तिसर्‍या क्रमांकाची मोठी तेल कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) तब्बल ४४ हजार कोटी रुपये मोजून ताब्यात घेण्याची दाट शक्यता आहे. देशातील तेल कंपन्या एकत्र करून जगातील एक विशाल तेल कंपनी निर्माण करण्याच्या सरकारच्या धोरणानुसार या दोन कंपन्यांचे विलीनीकरण होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशातील सरकारी तेल कंपन्यांचे विलीनीकरण करून जगातील मोठय़ा समकक्ष तेल कंपन्यांसारखी विशाल तेल कंपनी स्थापन करण्याचा सूतोवाच अर्थसंकल्पात केला होता. ओएनजीसी ही भारतातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी आहे. ती कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमधील सरकारचे ५१.११ टक्के भांडवल सुमारे ४४ हजार कोटी रुपये मोजून खरेदी करणार आहे. तसेच एचपीसीएल कंपनीतील इतर गुंतवणूकदारांकडील २६ टक्के भांडवल देखील खरेदी करण्याचा प्रस्ताव यानंतर मांडण्यात येणार आहे. एचपीसीएल कंपनीची वार्षिक तेल शुद्धीकरण क्षमता २३.८ दशलक्ष टन आहे. ही क्षमता ओएनजीसीकडे आल्यामुळे ती कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर देशातील तिसर्‍या क्रमांकाची मोठी तेलशुद्धीकरण कंपनी होणार आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये जीडीपी वाढीचा दर ७ टक्के

नोटाबंदीचा सकल राष्ट्रीय उत्पादनावर (जीडीपी) फारसा परिणाम झालेला नाही हे दर्शवणारी ...

news

देशभरात बँकांचा एकदिवसीय संप

विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) नेतृत्वाखालील संघटनांनी आज ...

news

1 एप्रिलपासून 5 सहयोगी बँकांचं एसबीआयमध्ये विलिनीकरण

स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ ...

news

लातूर द्राक्ष उत्पादन घटले

लातूर जिल्ह्याला द्राक्षांच्या निर्यातीतून २०१० सालापूर्वी सुमारे ७० कोटी रुपये मिळायचे. ...

Widgets Magazine