गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (13:05 IST)

आता कांदा करणार वांदा

onion
टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे याचा परिणाम जेवणाच्या थाळीवरही झाला आहे. नुकत्याच रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या अहवालानुसार, शाकाहारी थाळी २८% महाग झाली आहे. तर, मांसाहारी थाळी ११% महाग झाली आहे. यानुसार टोमॅटोने सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे. टोमॅटोबरोबर इतर भाज्यांचे दरही वाढले आहेत. इतकेच नाही तर या महिन्याच्या अखेरीस किरकोळ बाजारात कांद्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात कांदा ३५ ते ४० रूपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
 
पाऊस आणि पुराचा परिणाम आता कांद्यावरही होऊ लागला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून कांद्याचा पुरवठा आता हळूहळू कमी होत आहे. साठ्यात ठेवलेला कांदा पुढील महिन्यापासून बाहेर पडण्यास सुरुवात होणार असून त्यामुळेच येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढणार आहेत. सध्या कांदा ३० रुपये किलोने बाजारात विकला जातोय. मात्र, व्यापारी ज्या प्रकारे चिंता व्यक्त करत आहेत, त्यावरून भविष्यात कांदा ३५ ते ४० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कांद्याचे भाव आता काही काळ स्थिर आहेत. परंतु, येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढू शकतात. त्याचे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पाऊस आणि पूर. पुढे ते म्हणाले की, पूर आणि पावसामुळे राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून येणा-या कांद्याचा पुरवठा हळूहळू कमी झाला आहे. याचाच अर्थ पूर आणि पावसाचा कांद्यावर परिणाम झाला आहे. तर, ज्या कांद्याचा साठा करून ठेवलेला आहे. तो आता हळूहळू बाहेर पडू लागेल, त्यामुळे कांद्याचे भाव वाढणार आहेत.
 
त्यामुळेच सध्या बाजारात १७ ते २० आणि २२ रुपये किलोने उपलब्ध असलेला आणि किरकोळ बाजारात ३० रुपये किलोने उपलब्ध असलेला कांदा येत्या काही दिवसांत ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे व्यापा-यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.