शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नाशिक , बुधवार, 5 फेब्रुवारी 2020 (11:52 IST)

कांद्याच्या भावात विक्रमी घसरण

कांद्याच्या भावात विक्रमी घसरण झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण दोन दिवसांमध्ये कांद्याच्या भावात सातशे रुपयांची घसरण झाली. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण पंधरा हजाराच आसपास आवक झाली, बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव 1800 रुपांपेक्षा कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे.
 
गेल्या चार दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरावर परिणाम झाला आहे. परदेशातून आयात केलेला कांदा अजूनही जेएनपीटी बंदरात पडून आहे. त्यात राज्यातल्या कांद्याचीही आवक वाढली आहे. त्यामुळे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. एका महिन्यात जवळपास साडेसहा हजाराच क्विंटलच्या आसपास भाव कमी झाला आहे. सरकारने निर्यातबंदी लवकरात लवकर न उठवल्यास भावात अजून घसरण होऊ शकते. लासलगाव, मनमाड, नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही कांद्याच्या दरात घसरण पाहायला मिळणार आहे. कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 1800 रुपयेभाव मिळाला. शनिवारी कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 2700 रुपये भाव मिळाला होता. त्यात आज क्विंटलमागे 900 रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.