testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कांदा भाव पडले, कमावलेले ६ रुपयांची मनीऑर्डर शेतकऱ्याने दिली मुख्यमंत्री यांना

सध्या राज्यात कांद्याच्या दरात घसरण झाली आहे.
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असून फार संकटात सापडला आहे. त्यात
आपली व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने कांदा विकून मिळालेल्या ६ रुपयांची थेट मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर केलीय.
संगमनेरच्या अकलापूर येथील शेतकरी श्रेयस आभाळे यांनी आपल्या शेतात दोन एकर कांद्याचे पीक घेतले असून,
त्यासाठी ठिबक सिंचनाचा प्रयोग करत अडीच लाख रुपये खर्च केले होते. संगमनेर बाजार समितीत आणलेल्या कांद्याच्या गोण्या गगनगिरी ट्रेडिंग कंपनी या आडतदाराकडे दिल्या असता त्यांच्याकडील चांगल्या कांद्याला २ रुपये ५१ पैशाचा, मध्यम कांद्याला ७५ पैसे आणि हलक्या कांद्यासाठी ६३ पैसे किलोचा भाव मिळाला. ५१ गोण्या विकून ३ हजार २०८ रुपये त्यांच्या हातात पडले. हा कांदा उतरवण्यासाठी हमाली वजन करण्याचा खर्च, वाहतुकीचा खर्च , वारई यावर त्यांचे ३२०२ रुपये खर्च केले. बाजारात विक्रीसाठी आणलेल्या कांदा विक्रीतून त्यांच्या हाती अवघे फक्त सहा रुपये राहिले. त्यावर संतापलेल्या आभाळे यांनी या सहा रुपयांची मनीऑर्डर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. सोबतच या पैश्यातून त्यांनी शेतीविषयक पुस्तक घ्या असा सल्ला दिला आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने मराठवाड्यात आंदोलन

national news
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लातूर जिल्ह्यात सर्व तालुक्यातून मोर्चे ...

निवडणुका निकाल : भाजपच्या अंतर्गत कलह सुरु

national news
नुकत्याच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये झालेल्या भाजपाच्या निवडणुका पिछेहाटीनंतर ...

वसुंधरा विजयी झाल्या पण भरारी काँग्रेसची

national news
नेहमीप्रमाणे राजस्थामध्ये सत्तापालटाचा क्रम कायम राहिला. अंदाजाप्रमाणेच भाजपाला अपयश तर ...

शीर्ष फेसबुक शॉर्टकट्स 'की'ज

national news
असे बरेच शॉर्टकट 'की'ज आहे ज्याचा वापर फेसबुकचा सोयीस्कर आणि मनोरंजक वापर करण्यासाठी केला ...

ठाणेकर तुमचे पाणी महागले, सांभाळून वापर करा

national news
पावसाने फार कमी वेळ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागणार ...