शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

यापुढे पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकल्यास दोन टक्के चार्ज

आता क्रेडिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकल्यास दोन टक्के चार्ज द्यावा लागणार आहे , 8 मार्चपासून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. क्रेडिट कार्डमधून पैसे टाकल्यास 2 टक्के चार्ज लागत असला तरीही नेट बँकिंग आणि डेबिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकण्यास मात्र कोणताच चार्ज नसेल. दरम्यान, क्रेडिट कार्डमधून पैसे टाकल्यास तुम्हाला पूर्ण कॅशबॅक मिळणार आहे. क्रेडिट कार्डमधून पेटीएमवर एखादी वस्तू खरेदी किंवा बिल पेमेंट केल्यास कोणताही अतिरिक्त चार्ज लागणार नाही. नोटाबंदीनंतर पेटीएमनं छोट्या दुकानदारांसाठी 0% प्लॅटफॉर्म फी सुरु केलं होतं. कारण की, त्यांनी जास्तीत जास्त पेटीएमचा वापर करावा,  पण अनेक यूजर्स हे पेटीएमच्या माध्यमातून पैसे स्वीकारत होते. पण कोणतंही शुल्क न देता ते आपले पैसे बँकेत जमा करत होते. त्यामुळे पेटीएमनं हा निर्णय घेतला.