शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 8 सप्टेंबर 2018 (09:20 IST)

पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होण्याचे सत्र सुरूच

सातत्याने घसरणारा रुपया आणि आंतराष्ट्रीयबाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येत आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. शनिवारी पेट्रोलचा मुंबईतला दर ८७ रूपये ७७ पैसे आहे. तर डिझेलचा दर ७६ रूपये ९८ पैसे इतका आहे. तर दिल्लीतला शनिवारचा दर ८० रूपये ३८ पैसे लिटर इतका आहे तर डिझेलचा दर ७२ रूपये ५१ पैसे इतका आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी  पेट्रोलचे दर ३८ पैशांनी महागले आहेत. प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.