शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

पेट्रोल- डिझेल महागले

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलिटर 0.42 पैशांनी तर डिझेल 1.03 रूपयांनी महाग झाले आहे. रविवारी मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत.
 
याआधी नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच म्हणजेच 1 जानेवारीला पेट्रोल 1 रूपया 29 पैशांनी महागले तर डिझेल 97 पैशांनी वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या बदललेल्या दराचा आणि रूपया- डॉलरच्या विनिमयाचा आढावा घेऊन हे दर निश्चित केले जातात.