गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (08:45 IST)

पीएमसी बँक घोटाळा, आरोपींच्या मालमत्तेचा लिलाव करुन पैसे वसूल करणार

पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्तेचा लिलाव करुन पैसे वसूल करण्याचा निर्णयठाकरे सरकारने पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता पीएमसी बँक घोटाळ्यातील रक्कम वसुलीसाठी राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि एचडीआयएलची मालमत्ता विकून वसुली करण्यात येणार आहे. या मालमत्तेचा लिलाव करुन पैसे वसूल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.
 
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी तक्रार केली होती. या तक्रारीला उत्तर देतानाच सतेज पाटील यांनी आरोपींच्या मालमत्ता विकून आर्थिक वसूली केली जाणार असल्याची माहिती दिली. रविंद्र वायकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करुन खातेदारांची रक्कम अदा करावी, अशी मागणी केली होती. यावर राज्य सरकारने मालमत्ता जप्त करुन लिलाव करण्याचा निर्णय घेतल्याचं पत्र गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी तक्रारदारांना लेखी पत्राद्वारे दिलं.
 
या पत्रात म्हटलं आहे, “पीएमसी बँक आणि एचडीआयएल कार्यालयाचा मुख्य सर्वर तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे. तो विश्लेषणासाठी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा कलिना येथे पाठवण्यात आला आहे. विविध पीएमसी बँकेचे 43 खातेधारक ज्यांचे पीएमसी बँकेत ठेवी आहेत, परंतु ते पैसे न काढू शकल्याने त्यांना त्रास झाला आहे. त्यांचे जबाब नोंदवून त्यांचा उपयोग गुन्ह्यात पुरावा म्हणून करण्यात आलेला आहे.”