1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 30 ऑगस्ट 2023 (07:17 IST)

सणासुदी अगोदर डाळी महागल्या

Pulses
सणासुदीच्या तोंडावर हरभरा डाळीसह मैदा, रवा, साखरेच्या दरात वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी १३४ रुपये असलेली तूर डाळ १५२ रुपये किलोवर गेली असून, ती येत्या काही दिवसांत १७० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.
 
हरभरा डाळीची मागणीही पोळ््यासह इतर सणामुळे वाढणार असल्याने नागरिकांचा खिसा कापला जाणार आहे. तांदळाचे उत्पादनही कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तांदळाचे भाव आता स्थिर असले, तरी भाव वाढण्याचे संकेत मिळत आहेत. श्रावण महिन्यात सण सुरू होतात. त्यात प्रत्येक वस्तूचा खप वाढतो.
 
सणासुदीच्या काळात सर्वच पदार्थांची मागणी वाढते. दुसरीकडे अवकाळी पावसामुळे फळे आणि भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे महागाईच्या काळात या गोष्टींच्या किमती आणखी वाढू शकतात, असे व्यापा-यांचे म्हणणे आहे. तूर डाळ, भाजीपाला, कडधान्यांच्या किमतीत गेल्या दोन महिन्यांत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. जून-जुलैच्या तुलनेत आता घराचा किचनचा खर्च साधारणत: १५ टक्क्यांनी वाढल्याने खिशाला झळ बसली आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor