बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

रेल्वे प्रशासनातर्फे नवीन सुविधा सुरू

रेल्वे प्रशासनातर्फे नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. नवीन सुविधेच्या अंतर्गत रेल्वे अधिकारऱ्यांसाठी असलेल्या रेल्वे डब्यातून आता सामान्य प्रवाशीही प्रवास करु शकतील. प्रवाशांसाठी अशाप्रकारची ही पहिलीच संधी आहे. आयआरसीटीसीने अशाप्रकारची सेवा जून्या दिल्ली रेल्वे स्थानकावर सुरू केली होती. रेल्वे अधिकाऱ्यांना व्ययक्तिकरीत्या मिळणाऱ्या डबे आता सहा प्रवाशांनी बुक केले आहेत. या परिवाराने IRCTC तून 2 लाख रुपये भरून ही बुकींग केली आहे. लांबच्या प्रवासासाठी इंग्रजांच्या काळात हे बनवले होते. यात चालत्या फिरत्या लग्झरी हॉटेलची सुविधा असते. त्याचबरोबर बेडरुम आणि टॉयलेट-बाथरूम असते.
 
यात चार दिवसांचा प्रवास म्हणजे ट्रेनने जम्मूला जायचे आणि जम्मूहून दिल्लीला परत यायचे, असा प्रवास होईल. यात तुम्हाला हॉटेलप्रमाणे पूर्ण आराम मिळतो. यात सर्व्हिससाठी रेल्वेचा स्टॉफ असतो. रेल्वे बोर्डाचे ऑफिर्सशिवाय रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री आणि राष्ट्रपती यांच्यासाठी खास ही सुविधा असते.
 
पियुष गोयल केंद्रीय रेल्वेमंत्री झाल्यानंतर या नियमांमध्ये बदल करण्यात आले. गरज नसल्यास हे सेल्स वापरले जावू नये. त्याचबरोबर सामान्यांना भाड्याने देण्याची पॉलिसीही बनवण्यात आली आहे. यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात भर पडणार आहे.  या डब्यात  वातानुकूलित बेडरुम्स, लिव्हिंग रुम, एक पेंट्री, टॉयलेट, किचन, वालेट सर्व्हिस ह्या सुविधा आहेत.