गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 20 एप्रिल 2020 (22:15 IST)

20 रुपयांचे नवीन नाणे येणार, आरबीआयने दिली माहिती

लवकरच बाजारात 20 रुपयांचे नवीन नाणे येणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन दिली आहे. मुंबईशिवाय कोलकाता, नोएडा आणि हैद्राबाद येथील मिंट (टांकसाळ) मध्येही 20 रुपयांची नाणी तयार केली जात आहे. केंद्र सरकारने गेल्यावर्षी 8 मार्च 2019 रोजी नाण्यांची सीरिज जारी केली होती. या सीरिजमध्ये 20 रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता. ही नाणी विशेष म्हणजे दृष्टीहीन लोकांसाठी तयार केली आहेत. ते ही नाणी सहज ओळखू शकतात.
 
11 वर्षानंतर हे नवीन नाणं भारतीय चलनात येणार आहे. या नाण्यामध्ये 12 कोने आहेत. यापूर्वी मार्च 2009 मध्ये 10 रुपयांचे नाणे भारतीय चलनात आणले होते. 
 
नवीन नाण्याचे वैशिष्ट्य
 
हे नवीन नाणे 20 एमएम व्यासचे असेल
नाण्यामध्ये 12 कोने असतील
20 च्या नाण्यामध्ये 10 रुपयांच्या नाण्याप्रमाणे 2 रिंग असणार
वरच्या रिंगवर 65 टक्के तांबा, 15 टक्के जिंक आणि 20 टक्के निकेल असेल
आतल्या रिंगवर 75 टक्के कॉपर, 20 टक्के जिंक आणि 5 टक्के निकेल असेल