1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (11:49 IST)

Reliance Jio : जीओचा सर्वात स्वस्त प्लान, 84 दिवसांची वैधतासह सादर

jio plan
रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओच्या यादीत अनेक प्लान आहे  ज्यामध्‍ये युजर्सना 84 दिवसांची दीर्घ वैधता मिळते. या प्लॅनमध्ये जिओ यूजर्सना स्वस्त डेटा, फ्री कॉलिंग आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
 
Reliance Jio ने 44 कोटींहून अधिक ग्राहकांसाठी आपल्या रिचार्ज योजना अनेक श्रेणींमध्ये विभागल्या आहेत. जिओकडे रिचार्ज प्लॅनची ​​मोठी यादी आहे. या यादीमध्ये स्वस्त ते महाग आणि अल्प मुदतीपासून लॉन्ग टर्मचे प्लान आहेत. गरजेनुसार त्यांची निवड करू शकता.
 
जिओचा 666 रुपयांचा प्लान
जिओच्या लिस्टमध्ये 666 रुपयांचा प्लान आहे. यामध्ये यूजर्सना 84 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये कंपनी युजर्सला 126GB डेटा ऑफर करते, युजर्स 84 दिवसांमध्ये दररोज 1.5GB डेटा वापरू शकता. या मध्ये  दररोज मोफत कॉलिंग आणि 100 SMS देखील मिळतात. यामध्ये Jio Cinema, Jio TV आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. 
 
जिओचा 739 रुपयांचा प्लान
Jio आपल्या ग्राहकांना 739 रुपयांच्या प्लानमध्ये 84 दिवसांची वैधता देखील देत आहे. यामध्ये यूजर्सला दररोज 1.5GB डेटा मिळतो. या प्लानमध्ये सर्व सुविधा दिल्या आहेत ज्या तुम्हाला 666 रुपयांच्या प्लानमध्ये मिळतात. परंतु, यामध्ये कंपनी ग्राहकांना Jio Saavn Pro चे सबस्क्रिप्शन देखील देत आहे जे यामध्ये उपलब्ध नाही. 
 
जिओचा 758 रुपयांचा प्लान
Jio च्या लिस्टमध्ये 758 रुपयांचा प्लान देखील आहे. यामध्ये देखील युजर्सना फक्त 84 दिवसांची वैधता मिळते. यासोबतच संपूर्ण वैधतेसाठी 126GB डेटा दिला जातो म्हणजेच तुम्ही दररोज 1.5GB डेटा वापरू शकता. या प्लानचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कंपनी Disney Plus Hot Star चे सबस्क्रिप्शन देखील देते. यासोबतच यामध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडची सुविधाही उपलब्ध आहे. 
 
Edited by - Priya Dixit