Royal Enfield Bullet 350 आणि Classic 350 च्या किमतीत वाढ, जाणून घ्या किंमत
Royal Enfield (रॉयल एनफील्ड) यांनी आपल्या सर्वात स्वस्त मोटरसायकलच्या सीरीजच्या किमती वाढविल्या आहेत. Royal Enfield Bullet 350 BS6 आता महाग झाल्या आहेत.
रॉयल एनफिल्ड ची मॉर्डन आणि क्लासिक मोटरसायकल Bullet 350 BS6 तीन व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहेत. या बाईकच्या तिन्ही व्हेरियंट मध्ये सर्वात स्वस्त मॉडल X आहे, त्या नंतर मिड-व्हेरियंट Standard Black आणि टॉप-ऍड मॉडल ES (इलेक्ट्रिक स्टार्ट) आहे. Royal Enfield Bullet 350 BS6 च्या तिन्ही व्हेरिएंट ची एक्स शो रूम किमतीत 2,756 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याच बरोबर कंपनीने Royal Enfield Classic 350 च्या किमतीत देखील 2,756
रुपयांनी वाढ केली आहे.
Bullet 350 ची नवी किंमत -
किमतीत वाढ झाल्यावर रॉयल एनफिल्ड Bullet X 350 व्हेरियंटची दिल्ली मध्ये एक्स शो रूम किंमत वाढवून 1,33,260 रुपये झाली आहे. टॉप व्हेरियंट इलेक्ट्रिक स्टार्टची एक्स शो रूम ची किंमत 1,42,705 रुपये झाली आहे.
कंपनीने बाईकच्या किमतीत वाढ करण्याव्यतिरिक्त कोणतेही बदल केलेले नाही. Royal Enfield Bullet 350 BS6 मोटरसायकलच्या वाढीव किंमत कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदविण्यात आल्या आहेत.
बुलेटचे इंजन -
रॉयल एनफिल्ड भारतीय पोर्टफोलियोमध्ये Bullet 350 सर्वाधिक विकले जाणारे मॉडल आहे. बाइक मध्ये 346cc चे सिंगल सिलिंडर फ्युल इंजेक्टेड इंजन आहे. हे इंजन 19.1 bhp ची पॉवर आणि 28Nm चे पीक टॉर्क जनरेट करतं. बाइक मध्ये 5 स्पीड गियर बॉक्स दिले आहे. रॉयल एनफिल्ड बुलेटच्या जुन्या लुकला आतापर्यंत कायम ठेवला आहे. Bullet 350 च्या फ्युल टॅंक आणि साइड पॅनल्स वर काळ्या रंगासह गोल्डन पिन स्ट्राइप्स दिल्या आहेत. कंपनीने आपल्या या लोकप्रिय अश्या मॉडल ला नवीन आकर्षक रंगांसह सादर केले आहेत.
Classic 350 ची नवी किंमत -
किमतीत वाढ केल्यावर आता Classic 350 ची किंमत 1.61 लाख रुपयांवरून 1.86 लाख रुपये करण्यात आली आहे. यामध्ये सिंगल चॅनल ABS मॉडल ची किंमत 1.61 लाख रुपये, तर ब्लॅक कलर ड्युल चॅनेल ABS मॉडलची किंमत 1.69 लाख रुपये करण्यात आली आहे. ड्युल चॅनेल ABS गनमेटल ग्रे स्पोक मॉडल आता 1.71 लाख आणि ड्युल चॅनल ABS गनमेटल ग्रे अलॉय मॉडल 1.83 लाख रुपये किमतीचे झाले आहे.
ड्युल चॅनल ABS च्या सह आलेल्या क्लासिक 350 के एयरबर्न ब्लू आणि स्टॉर्मराइडर सैंड मॉडल ची किंमत 1.79 लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच ड्युल चॅनल ABS क्लासिक 350 च्या स्टील्थ ब्लॅक आणि क्रोम ब्लॅक मॉडल ची किंमत आता 1.86 लाख रुपये झाली आहे.
नवी बाइक येतं आहे -
रॉयल एनफिल्ड आपली J प्लॅटफार्म वर असलेली मोटरसायकलची नवी शृंखला आणायचा तयारीत आहे. कंपनीच्या या सिरीज किंवा शृंखलेत Meteor 350 बाइक हे पहिले मॉडल असू शकतं. रॉयल एनफिल्ड Meteor 350 ची बरीचशी माहिती दिली गेली आहे आणि ती आपल्या समोर देखील आलेली आहे. कंपनी आपल्या या बहुप्रतीक्षित मोटर सायकलला सप्टेंबरच्या शेवटी बाजारपेठेत आणण्याची तयारी करीत आहे.