शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018 (14:51 IST)

रुपयाचा दर पहिल्यांदा 71 रुपयांच्या जवळ

भारतीय चलनात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी रुपयाचा दर पहिल्यांदा 71 रुपयांच्या जवळ पोहोचला. पेट्रोल आणि डिझेलने देखील मोठा उच्चांक गाठला आहे. तसेच केंद्र सरकारने देखील गॅसच्या दरात वाढ केली आहे. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाने आपला अगदी निच्चांक गाठला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयात 21 पैशाची घसरण पाहायला मिळाली आहे. आजचा रुपयाचा दर हा 70.95 रुपये आहे. गुरूवारी महिन्याच्या शेवटी डॉलरची मागणी आणि क्रूड ऑईलची मागणी वाढल्यामुळे रुपयात 15 पैसे दर तुटला असून आता तो 70.74 प्रति डॉलर झाला आहे.  
 
शुक्रवारी दिल्लीत पेट्रोल 22 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 28 पैसे प्रति लीटर महागलं आहे. दिल्लीत पहिल्यांदा डिझेल 70 रुपये झालं आहे. शुक्रवारी दिल्लीत एक लीटर डिझेल 70.21 रुपये दर होता. गेल्या एका महिन्यात दिल्लीत पेट्रोल 2.27 रुपये प्रती लीटर आणि डिझेल 2.46 रुपये प्रती लीटर पर्यंत पोहोचलं आहे.