शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 3 डिसेंबर 2018 (09:00 IST)

साई संस्थान सरकारला देणार बिनव्याजी कर्ज

शिर्डीतील साई संस्थानने राज्य सरकारला तब्बल पाचशे कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी नगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. मात्र, या बिनव्याजी कर्जाची परतफेड सरकार कधी करणार, याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही.
 
नगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्प चाळीस वर्षांपासून रखडले आहे. या प्रकल्पासाठी १,२०० कोटींचा खर्च अपेक्षित असून, शिर्डी संस्थानकडून बिनव्याजी कर्जरूपात ५०० कोटी, तर अर्थसंकल्पातून ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने शिर्डी संस्थानकडे कर्जाची मागणी केली होती.