शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

सारस्वत को-ऑपरेटिव्‍ह बँक ची व्हॉटसअप बँकिंग सेवा सुरू

सारस्वत को-ऑपरेटिव्‍ह बँक आपल्‍या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण डिजीटल सेवा प्रदान करणार आहे.  व्हॉटसअप बँकिंग सेवा पुरविणारी सारस्वत बँक ही भारतातील दुसरी आणि सहकारी बँकांच्या क्षेत्रातली पहिली बँक ठरली आहे.
 
फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉटसअप या मेसेजिंग व्यासपीठाने नुकतीच ‘व्हॉटसअप फॉर बिझनेस’ ही सेवा सुरु केली आहे. युजर इनिसीएशनला प्रतिसाद म्‍हणून सॉफ्टवेअर इंटरॅक्शनचा उपयोग करत टेक्‍स्‍ट मेसेजेसचे नोटीफीकेशन, बोर्डिंग पासेस, पावत्या, तिकीट, अकाऊंट स्टेटमेंट यांसारख्या गोष्टी ग्राहकांना पाठविल्‍या जातील.
 
‘व्हॉटसअप बँकिंग सेवा’ या सेवेच्या माध्यमातून सारस्वत बँकेच्या ग्राहकांना एसएमएसच्या ऐवजी व्हॉटसअप नोटीफीकेशन मिळू शकतील. त्याचबरोबर ग्राहक येथे संवादही साधू शकतील. शिवाय खात्यातील शिल्लक तपासणे, मिनी स्टेटमेंट मिळविणे इत्यादी गोष्टी याद्वारे साध्य होतील. मोबाईल बँकिंग नोंदणी, बँकेच्‍या इतर उत्पादनाची माहिती, विनंती/चौकशी, अर्ज/अॅप डाऊनलोड करणे इत्यादी गोष्टी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने उपलब्‍ध होतील. बँकेच्‍या उत्पादनाच्या माहिती संदर्भातली सखोल चौकशी, व्याज दर, अर्ज डाऊनलोड करणे इत्यादी गोष्टी करीत एका क्लिकद्वारे येथून थेट जाण्‍याची सुविधा देखिल बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल. 9029059271 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ग्राहक ‘व्हॉटसअप बँकिंग सेवा’ यासाठी नोंदणी करू शकतात.