testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जीएसटीसाठी 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्क्यांपर्यंत दर

Last Modified शनिवार, 20 मे 2017 (09:41 IST)
श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या जीएसटी काऊन्सिलच्या
बैठकीत अरुण जेटलींनी जीएसटीच्या दर निश्चित केले आहेत. सेवा आणि सुविधांवर जीएसटीत चार प्रकारांत दर ठरवण्यात आले आहेत. जीएसटीसाठी 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्क्यांपर्यंत दर ठेवण्यात आला आहे. अरुण जेटली म्हणाले, ट्रान्सपोर्स सर्व्हिसवर 5 टक्के कर लावला जाणार आहे. तर लग्झुरी सुविधांसाठी 28 टक्के कर निश्चित करण्यात आला आहे.
यापूर्वीच्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत 1211 वस्तूंवरील कर निश्चित करण्यात आला होता.
जीवनावश्यक वस्तूंना जर राज्याच्या करदरातून सूट असेल तर त्यांना जीएसटीमध्येही सूट राहणार आहे. जीएसटीमुळे कराचा बोजा कमी होऊन वस्तू स्वस्त होतील, असेही जेटली यांनी स्पष्ट केले.


यावर अधिक वाचा :