मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 (16:24 IST)

लातूर विभाग राज्यात उत्पन्न कमविण्यात प्रथम स्थानी

राज्य परिवहन महा मंडळाच्या लातूर विभागाने यावर्षी सुद्धा उत्पन्नात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामध्ये एस टी च्या असलेल्या मराठवाड्यातील लातूर विभागाने मागच्या ११ वर्षांपासून यशाचे हे सातत्य टिकवले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. 
 
लातूर विभागाने खर्चातही कपात केली आहे. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी, लातूर विभागाने महामंडळाकडे १० स्लिपर, ३० वातानुकुलीत बसेसची मागणी केली आहे. दररोज १८५ बस फेर्याळ होतात, २०० गाड्यांसह ३२९ मार्गावरुन १५२२ कर्मचार्र्‍यांच्या सहाय्याने ६२,२७० किलोमीटर्सची वाहतूक केली जाते. दररोज ८८,१५५ प्रवाशी प्रवास करतात. 
 
लातूर विभागात लातूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा या आगारांचा समावेश होतो. वाढती लोकसंख्या लक्षात घेता अंबाजोगाई मार्गावर दुसर्या  बसस्थानकाची सोय करण्यात आली आहे. भविष्यात प्रवाशांना आणखी चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची विभागाने म्हटले आहे.