शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 6 जानेवारी 2020 (10:36 IST)

'टाटा समूहप्रमुख म्हणून परतण्यात स्वारस्य नाही'

टाटा उद्योगसमुहात टाटा सन्सचे अध्यक्षपद किंवा टीसीएस, टाटा टेलिसर्विस, टाटा इंडस्ट्रीजमध्ये संचालक होण्यात स्वारस्य़ नसल्याचे सायरस मिस्त्री यांनी स्पष्ट केले आहे.
 
टाटा समुहाचे अध्यक्षपद आणि इतर कंपन्यांच्या संचालकपदी त्यांची पुन्हा नियुक्ती करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावरहोणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मिस्त्री यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
 
कंपनी लवादाने आपल्या बाजूने निर्णय दिला असला तरीही मी कोणत्याही पदासाठी इच्छुक नाही. टाटा समुहाचे हित कुणाही व्यक्तीच्या हितापेक्षा अधिक महत्त्वाचे असून या समुहाच्या भल्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.