शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

टीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार

टाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी सकाळी शेअर बाजारात टीसीएसच्या समभागांमध्ये 2 टक्क्यांनी वाढ झाली. यासह कंपनीचे बाजर मूल्य 100 अब्ज अमेरिकी डॉलरच्या पलीकडे गेले. असा टप्पा गाठणारी टीसीएस ही भारतातील पहिलीच कंपनी ठरली आहे. 
 
शेअर बाजारात शुक्रवारनंतर सोमवारी देखील टीसीएसच्या शेअरमध्ये तेजी दिसली. टीसीएसचे शेअर 3 हजार 476.75 अंकांवर पोहोचले. त्यामुळे कंपनीचे बाजर मूल्य 6 हजार 64,918 कोटींवर पोहोचले. शुक्रवारी देखील टीसीएसच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळे शेअरधारकांना जवळ जवळ 40 हजार कोटींचा फायदा झाला होता. गेल्या आठवड्यात गुरुवारी टीसीएसने चौथ्या तिमाहीतील नफा जाहीर केला होता. त्यात कंपनीला 6 हजार 925 कोटींचा फायदा झाला होता.