सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 4 डिसेंबर 2023 (08:07 IST)

फळपिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत वाढवली

dhananjay munde
मुंबई : शेतक-यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रबी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा भरण्याच्या अंतिम तारखेत वाढ करण्यात आली आहे. शेतक-यांना विमा योजनेत भाग घेण्यासाठी पीक विमा पोर्टल दिनांक ४ व ५ डिसेंबर २०२३ रोजी सुरू राहणार आहेत. कोकणातील आंबा, काजू, संत्रा, रबी ज्वारी या पिकांसाठी पीक विमा योजनेत भाग घेण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२३ होती. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे.
 
फळपिकांचा पीकविमा भरण्याची अंतिम तारीख ही ३० नोव्हेंबर होती. मात्र काही शेतकरी विविध तांत्रिक अडचणींमुळे पीकविमा भरू शकले नाहीत, याचा विचार करून केंद्राकडे विनंती केली होती. त्यानंतर यामध्ये वाढ करण्यात आली असून दिनांक ४ आणि ५ डिसेंबर या दोन दिवसांत वरील पिकांचा विमा भरता येणार आहे. उर्वरित शेतक-यांनी आपल्या पिकांचा विमा भरून या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.