शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated :सांगली , बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:45 IST)

फळांचा राजा आंबा हापूस’ आला रे…मुहूर्ताचा दर ४ हजार दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

सध्या द्राक्षाचा हंगाम सुरू असताना फळांचा राजा असलेला आंबा बाजारात दाखल झाला आहे. देवगड येथील हापूस आंबा विक्रीसाठी बालाजी चौकातील जुन्या मंडईजवळील फळ दुकानात आला आहे. १२ व १५ नगाच्या बॉक्सचा दर ३५०० ते ४ हजार रुपये आहे.
 
आंबा मार्च महिन्यात येण्यास सुरवात होते. तत्पूर्वी अन्य भागांतील आंबा येतो; परंतु ग्राहकांना खरी प्रतीक्षा असते ती देवगड, रत्नागिरी येथील हापूस आंब्याची. यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात देवगड येथून बालाजी चौकातील शाहरूख मुन्शी यांच्या लेटस् फळ दुकानात हापूसचे बॉक्स दाखल झाले आहेत. हापूसची बाजारातील पहिलीच एंट्री आहे. दरही जास्त आहे. १२ व १५ नगाच्या हापूस बॉक्सचा दर साडेतीन हजार ते ४ हजार रुपये आहे. यंदा आंब्याची आवक भरपूर आहे. हंगामाच्या शेवटी ती जास्त असेल, असे मुन्शी यांनी सांगितले. सध्या आंब्याचे दर विचारण्यास मंडईत गर्दी होत आहे. मुहूर्ताचा आंबा खरेदी करणारे हौशी ग्राहकही चौकशी व खरेदी करत आहेत.