शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018 (16:37 IST)

शेअर बाजार ९०० अंकांनी घसरला

वाढती महागाई, रुपयाची पडझड आणि आरबीआयने रेपो रेट कायम ठेवल्यानंतर शेअर बाजारावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. बाजार तब्बल 915.37 अंकांनी कोसळून 34,253 वर पोहचला. तर निफ्टी 322.35 अंकांनी खाली येत 10,272 वर पोहचला आहे. यासोबत आज रुपया आणखी घसरला असून प्रति डॉलर 74 रुपये इतकी किंमत मोजावी लागत आहे.