शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 30 एप्रिल 2024 (14:47 IST)

1 मे पासून हे नियम बदलणार!

1 मे पासून बँकांचे अनेक नियम बदलणार असून यामध्ये वेगवेगळ्या बँकांचा समावेश आहे. या बदललेल्या सर्व नियमांमुळे तुमच्या खिशाला झळ बसू नये म्हणून कोणते नियम बदलले आणि नवीन नियम कोणते लागू झाले आहेत हे माहित असणे महत्वाचे आहे. 1 मे पासून सिलेंडरच्या किमती तसेच बँकेच्ये व्यवहार यांमध्ये नवीन नियम लागू होणार आहे. आर्थिक वर्षातला नवीन महिना सुरु होणार असून सामान्य नागरिकांना समस्या येऊ शकते. तर अनेक गोष्टी येणाऱ्या 1 मे ला बदलणार आहे. कोणत्या बँकांचे नियम बदलणार तसेच नवीन नियम काय जाणून घेऊ या. 
 
आयसीआयसीआय बँक- 
आपल्या सेवाशुल्कात नवीन बदल आयसीआय बँकेने केला आहे. तसेच पासबुक सेवेसाठी काही शुल्क या 1 मे पासून द्यावे लागेल. तसेच ग्रामीण भागातील लोकांना डेबिट कार्डसाठी प्रत्येक वर्षी 99 शुल्क द्यावे लागतील तर शहरातील नागरिकांना 200 शुल्क द्यावे लागतील. तसेच 25 चेक, चेकबूकचे निशुल्क राहतील. 
 
 
आयडीएफसी बँक- 
आयडीएफसी बँक क्रेडिट कार्डच्या मदतीने बील देणं महागणार असल्याने जर तुम्ही वीजबिल, फोन बिल केबल बिल, इंटरनेट बिल पाणी बिल  हे जर तुम्ही क्रेडिट कार्डने करीत असाल तर तुम्हाला पैसे मोजावे लागतील. आयडीएफसी बँकेने देखील नियमांत बदल केले आहे. 
 
एचडीएफसी बँक- 
एचडीएफसी बँक ही खासगी क्षेत्रातील एक महत्वाची अग्रणी बँक आहे. एचडीएफसी बँकने देखील आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहे. एफडी योजनेच्या गुंतवणुकीसाठी तारिख या बँकेने नागरिकांसाठी वाढवली आहे. तुम्ही 10 मे पर्यंत गुंतवणूक करू शकतात. 2020 मध्ये या योजनेची सुरवात झाली होती. नागरिकांना अधिक व्याज मिळेल जर या योजनेमध्ये गुंतवणूक कर केली. 
 
येस बँक-
आपल्या नियमांमध्ये काही बदल 1 मी पासून येस बँकेने देखील केले आहे. कमीत कमी  50 हजार रुपये प्रो मॅक्स खाते असणाऱ्या ग्राहकांना आता त्यांच्या खात्यात ठेवावे लागणार आहे. कमीत कमी 25 हजार रुपये  प्रो प्लस बचत खात्यात ग्राहकांना ठेवावे लागणार आहे. तसेच 10 हजार रुपये प्रो बचत खात्यात ठवावे lagnar आहे. प्रतिवर्षी 299 रुपयांचे शुल्क एलिमेंट डेबिट कार्डसाठी  द्यावे लागले. एक्सप्लोअर डेबिड टार्डसाठी 599, एंगेज कार्डसाठी 399, तर डेबिट कार्डसाठी शेतकरी वर्गाला 149 रुपये द्यावे लागणार आहेत. 
 
गॅस सिलेंडर- 
गॅस सिलिंडरच्या दरात देखील प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल होत असतात. म्हणूनच सिलेंडरचा भाव 1 मे पासून बदलला जाऊ शकतो. पण सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे. म्हणून सर्वदूर चर्चा सुरु आहे की, लोकसभा निवडणूक असल्यामुळे सिलेंडरचे भाव बदलतील का? 
 
Edited By- Dhanashri Naik