शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 24 एप्रिल 2017 (15:55 IST)

शेतमाल तारण योजना

तूर डाळ खरेदी आता अनेक ठिकाणी बंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिडला आहे. त्यावर थोडा उपाय म्हणून आता तूर न देता शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेण्याचा सल्ला पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे.
 

जवळपास 316 तूर खरेदी केंद्र आहेत. सद्यस्थितीत प्रत्येक केंद्राबाहेर अंदाजे 20 हजार क्विंटल तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेली आहे. अजूनही तुरीची आवक सुरुच आहे. त्यामुळे लवकरात लवकर तूर खरेदी सुरु करावी, असे पत्र  सरकारला पाठवले आहेत. मात्र ज्यांनी आधी नोंदणी केली त्यांचा माल विकत घेवू असे सरकार म्हणत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी उद्रेक झाला आहे. 
 

यामध्ये शेतमाल तारण ठेवताना  योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच शेतमाल स्वीकारला जातो. कोणत्याही व्यापारी अथवा शेतकरी सोडून कोणीही  शेतमाल अंतर्गत स्वीकारला जात नाही. तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्या दिवसाचे बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरवण्यात येते.तारण कर्जाची मुदत 6 महिने (180 दिवस) आहे. तारण कर्जाचा व्याजाचा दर 6 टक्के आहे. त्यामुळे आता शेतकरी कोणत्या पद्धतीने कर्ज घेतो आणि कश्या प्रकारे घेतो हे पाहावे लागेल.