सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated :नवी दिल्ली , सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (12:56 IST)

कार खरेदीदारांना धक्का! या कंपनीची वाहने झाली महाग

Toyota Kirloskar Motor ने शुक्रवारी जाहीर केले की त्यांनी Urban Cruiser आणि  Glanza या दोन मॉडेलच्या किमती वाढवल्या आहेत. वाढीव किंमत 1 मे पासून लागू होणार आहे. मात्र, कंपनीने या गाड्यांच्या किंमती किती वाढल्या आहेत हे सांगितलेले नाही.
 
टोयोटा अर्बन क्रूझर आणि ग्लान्झा या दोन्ही ब्रँडच्या जागतिक स्तरावर सुझुकीसोबतच्या संबंधाचा भाग म्हणून येतात. अर्बन क्रूझर आणि ग्लान्झा या मारुती मारुती सुझुकी विटारा ब्रेझा कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि प्रिमियम हॅचबॅक बलेनोच्या रिबॅज केलेल्या आवृत्त्या आहेत.
 
भारतात 2 दशलक्ष कार विकून नवा टप्पा गाठल्याचे नुकतेच सांगितले असताना टोयोटाने किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑटोमेकरने गुरुवारी जाहीर केले की Glanza हे भारतात विकले जाणारे ब्रँडचे 2 दशलक्षवे मॉडेल आहे.
 
कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे इनपुट कॉस्टमध्ये झालेली वाढ अंशतः भरून काढण्यासाठी ही दरवाढ आवश्यक असल्याचा कंपनीचा दावा आहे. "आमच्या मौल्यवान ग्राहकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन एकूण दरवाढ कमी करण्यात आली आहे," असे ऑटोमेकरने म्हटले आहे.
 
या कंपन्यांनीही किंमत वाढवली
टोयोटा ही भारतातील एकमेव कार कंपनी नाही, जिने अलीकडच्या काही दिवसांत आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कच्च्या मालाची वाढती किंमत आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यामुळे इतर अनेक कार ब्रँड्सनीही त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, महिंद्रा, मारुती सुझुकी, टोयोटा, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ सारख्या अनेक वाहन निर्मात्यांनी त्यांच्या मॉडेल लाइनअपवर किमती वाढवण्याची घोषणा केली.