सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 7 जुलै 2018 (12:09 IST)

मल्ल्याची संपत्ती विकून बँकांना मिळाले 963 कोटी

बँकांनी विजय मल्ल्याच्या भारतातील सध्याच्या काही मालमत्ता विकून 963 कोटींची वसुली केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे एमडी अरिजित बसू यांनी  ही माहिती दिली. बसू यांनी सांगितले की, लंडनमध्येही रिकव्हरीसाठी कारवाईचा वेग वाढवला आहे. ब्रिटिश हायकोर्टाने ब्रिटनमधील एन्फोर्समेंट ऑफिसरला लंडनजवळ हर्टफोर्डशायरमधील मल्ल्याच्या मालमत्तांची चौकशी करून त्याचा शोध घेण्याची आणि जप्तीची परवानगी दिली आहे. हा आदेश भारतीय बँकांसाठीही फायद्याचा आहे. भारतीय बँकांना आता विदेशातील मल्ल्याच्या संपत्तीवर जप्ती आणणे सोपे होईल.
 
एसबीआयचे बसू म्हणाले की, मल्लवरील कर्जाची पूर्णपणे वसुली करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ब्रिटिश कोर्टाच्या निर्णयानंतर त्यापैकी मोठा भाग मिळणार असल्याची शक्यता आहे. एसबीआयच्या नेतृत्वातील 13 बँकांच्या कंजोर्शियमने मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला कर्ज दिले होते. 31 जानेवारी 2014 पर्यंत मल्ल्यावर बँकांचे 6,963 कोटींचे कर्ज होते. 2016 पर्यंत ही रक्कम 9,000 कोटी झाली. कर्ज फेडण्याचा दबाव वाढल्यानंतर मल्ल्या 2016 मध्ये विदेशात पळून गेला होता.