मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (20:20 IST)

फोन -पे काय आहे? जाणून घ्या

find out phone pay
फोन पे हे एक मोबाईल पेमेंट किंवा देय अ‍ॅप आहे जे आपल्या गरजेनुसार बऱ्याच प्रकाराचे देय किंवा पेमेंट देण्याचा पर्याय देतो. या फोन -पे वॉलेट चा मुख्य हेतू डिजिटली पेमेंटला अधिक सोपं बनविणे आहे.
 
ह्याचा वापर कसा करता येतो? 
* आपण ह्याला एका पाकिटाच्या रूपात देखील वापरू शकतो आणि थेट आपल्या बँकेच्या खात्यामधून किंवा डेबिट क्रेडिट कार्डाने पैसे देऊ शकतो.
* आपण बँकेच्या खात्याला लिंक करू शकता.
* पैसे ट्रान्सफर करू शकता.
*  बिल देऊ शकता 
* ऑनलाईन मोबाईल रिचार्ज देखील करू शकता. 
 
फोन-पे वर खाते उघडण्यासाठी काय करावं -
कोणत्याही पेमेंट अ‍ॅप वापरण्यापूर्वी त्यामध्ये आपले अकाउंट असणे महत्त्वाचे आहे.फोन पे वापरण्यासाठी महत्त्वाचे आहे आपल्या कडे स्मार्टफोन असणं.बँकेचे खाते असणं आणि मोबाईल नंबर बँकेशी लिंक असावा,डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असावे. फोन पे मोबाईल मध्ये इंस्टाल असणं.ईमेल आयडी असणं देखील महत्त्वाचे असते.
 
फोन-पे ची वैशिष्ट्ये -
*या मध्ये इंटरनेटच्या शिवाय पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात.
*या मध्ये एका खात्या मधून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारावे लागत नाही, हे पूर्णपणे मोफत आहे.
*बँक अकाउंट मधील जमा बॅलन्स बघता येतं.
*कोणत्याही पासवर्ड ची आवश्यकता नाही. 
* फोन-पे च्या वॉलेट मध्ये पैसे राखू शकतो. 
* पैसे सहजरीतीने देवाण घेवाण करता येतात.