शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (07:54 IST)

रेल्वेचं लाइव स्टेटस आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून देखील जाणून घ्या

रेल्वेने पुन्हा एकदा पुढचे पाऊल टाकले असून आता लाइव स्टेटस  व्हॉट्सअॅपवरून देखील जाणून घेता येणार आहे. वेबसाइट 'मेक माय ट्रिप' च्या मदतीतून रेल्वे प्रवाशांसाठी ही सुविधा सुरू केली असून, व्हॉट्सअॅपच्या मदतीने प्रवासी पीएनआरची स्थिती देखील जाणून घेऊ शकणार आहे. सर्व रेल्वे प्रवाशी लाइव रनिंग स्टेटस आणि पीएनआर स्टेटस करता रेल्वेच्या 139 या टोलनंबरवर फोन करून माहिती जाणून घेतली पाहिजे. आयआरसीटीसीची माहिती देखील तुम्हाला यात मिळणार असून, प्रवाशांना अनेकदा ज्या  समस्यांना सामोरे जावं लागत होते. त्यात आयटी कंपनी व रेल्वे मंत्री यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. स्मार्ट फोनवर व्हॉट्सअॅपवरून पीएनआर, ट्रेनचं लाइव स्टेटस पाहण्यासाठी 'मेक आय ट्रिप'च्या ऑफिशिअल व्हॉट्सअप नंबर 7349389104 ला तुमच्या मोबाइलमध्ये सेव करावा लागेल. याकरता तुमच्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअॅपचा लेटेस्ट वर्जन असले पाहिजे, तेही सुरु स्थितीत इंटरनेट सोबत.हा नंबर सेव केल्यावर व्हॉट्सअॅपमध्ये हा नंबर सर्च करवा लागे,  कॉन्टेक्टवर टॅप करून तुम्ही चॅट विंडोमध्ये ट्रेनचं लाइव स्टेटस चेक करण्यासाठी ट्रेनचा नंबर टाइप करा. पीएनआर स्टेटस चेक करण्यासाठी पीएनआर नंबर पाठवा. अशा पद्धतीने तुम्हाला पीएनआर आणि लाइव स्टेटस दिसू शकेल त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत.