1. वृत्त-जगत
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जुलै 2014 (11:49 IST)

आता डेबिट कार्डवरही लागणार तुमचा फोटो

देशात वाढत असलेल्या डेबिट कार्ड यूजर्सच्या सुरक्षेबाबत बघता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं खास मार्गदर्शक तत्त्वे सुचवली आहेत. आरबीआयनं देशातील सर्व बँकांना डेबिट कार्डवर खातेधारकाचा फोटो लावण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत ही सुविधा फक्त क्रेडिट कार्ड धारकांसाठी उपलब्ध होती. सोबतच आता ग्राहकांना आपल्या डेबिट कार्डचा विमाही काढता येणार आहे, ज्यात कार्ड हरवल्यास ग्राहकाला त्याचा विमा कव्हर मिळेल.

आरबीआयच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, की ज्या ग्राहकांजवळ अगोदरपासूनच डेबिट कार्ड आहे ते सुद्धा आपल्या कार्डचं रिन्यूअल करू शकतात. ज्यात त्यांच्या कार्डवर फोटो लागेल. आरबीआयनं बँकांना आपल्या ग्राहकांची स्वाक्षरीही कार्डवर लॅमिनेट करण्यास सांगितलं. म्हणजे कार्ड हरवल्यास धोक्यापासून वाचू शकता येईल. देशात वाढत असलेल्या सायबर क्राईममुळं आरबीआयनं हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय. एका रिपोर्टनुसार भारतात सायबर क्राइम खूप जलदगतीनं आपले पाय पसरवतोय. त्यामुळं अनेक बँक ग्राहकांची फसवणूक होतेय.