शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: दिल्ली , मंगळवार, 16 ऑगस्ट 2016 (11:20 IST)

आता रेल्वेचे स्वतंत्र बजेट असणार नाही!

आता यापुढे रेल्वेचे स्वतंत्र बजेट असणार नाही. रेल्वे बजेटचा समावेश मूळ अर्थसंकल्पातच करण्यात यावा, हा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडून स्वीकारण्यात आला आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, रेल्वेचे बजेट अर्थसंकल्पासोबतच असावे, यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहिले होते. अर्थ मंत्रालयाने या विलयाच्या एकूणच स्थितीवर अभ्यास करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. यात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. ही समिती ३१ आॅगस्टपर्यंत अहवाल देणार आहे. या निर्णयामुळे रेल्वे मंत्रालयाची स्वायत्तता संपून जाईल, अशी भीती अखिल भारतीय रेल्वे संघाचे महासचिव गोपाल मिश्रा यांनी व्यक्त केली आहे.